धुवाधार पावसात मुंबईकरांसाठी धावली मोनो

Mono-Rail
Mono-Rail

मुंबई - बुधवारी (ता. ४) झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण मुंबईची तुंबई झालेली असतानाही, सुमारे १४ हजार ९४७ मुंबईकरांच्या मदतीला मोनो रेल धावून आली. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकदरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोनो रेल काल तारणहार ठरली. नियोजित वेळेनंतरही दोन तास मोनो चालवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अडकलेल्या प्रवाशांना दिलासा दिला. 

मोनो रेल खांबांवरील पुलावरून धावत असल्याने तिला खाली तुंबलेल्या पाण्याचा काहीच अडथळा आला नाही. अशा स्थितीत प्रवाशांची अडचण आणि गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने बुधवारी रात्री ११ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत अतिरिक्त दोन तासांसाठी मोनो रेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना सुखरूपपणे प्रवास करणे शक्‍य झाले. विशेषतः मध्य रेल्वेवर चेंबूर-कुर्ला-मानखुर्द परिसरातील प्रवाशांना मोनोचा चांगलाच फायदा झाला. मध्य रेल्वे बंद पडल्याने दक्षिण मुंबईत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी महालक्ष्मीपर्यंत येऊन तेथून मोनोने चेंबूर गाठले. मोनो गाड्या २० मिनिटांनी येत असल्या तरी हमखास प्रवासाची हमी असल्याने प्रवासी तासभर रांगेत आनंदाने उभे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com