मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कुलाबा, दादर, सांताक्रूझ आणि अंधेरी परिसरात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय.

मुंबई- सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कुलाबा, दादर, सांताक्रूझ आणि अंधेरी परिसरात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे हिंदमातासारख्या सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांची उंची 4.41 मीटर इतकी आहे.

मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आतापासूनच ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. उपनगरातल्या कांदिवली, मालाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. दक्षिण मुंबई म्हणजेच कुलाबा ते भायखळा, मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

लोकांची नजर चुकवून १३ जण गेलेत धबधब्यावर पिकनिकला, तिथेच गाठलं मृत्यूने; गावावर पसरली शोककळा...

 

आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीत अतिमुसळधार तर पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा जोर बघता मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

शाब्बास! FAIR & LOVELY विरुद्धच्या लढ्याचं श्रेय मुंबईच्या 'या' तरुणीला

मुंबईत ऑरेंज अलर्ट मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) जारी केलेल्या जिल्हा अंदाज आणि इशाऱ्यानुसार, गुरुवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चक्रीय वाऱ्यांचे एक क्षेत्र दक्षिण गुजरात आणि त्या जवळील भागात तर दुसरे पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे. शनिवारपर्यत अशी परिस्थिती या भागात असणार आहे. तसेच तीव्र स्वरूपाची पश्चिम- उत्तर दमट हवा अरबी समुद्रापासून पश्चिम किनारपट्टीवर रविवार पर्यत वाहणार आहे. तर उत्तर पश्चिम भारत आणि भारतातील मैदानी भागातही अशाच स्वरूपाचे वारे शुक्रवारपासून वाहतील. या प्रभावामुळे पाऊस सक्रिय होऊन मुसळधार स्वरूपात तो गुजरात राज्य, पश्चिम किनार पट्टी आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पडेल.

heavy rain in mumbai and suburbs all citizens are advised to remain indoors


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in mumbai and suburbs all citizens are advised to remain indoors