मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं 'हे' आवाहन

पूजा विचारे
Thursday, 6 August 2020

मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे.

मुंबईः मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधारपाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या तर अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे.

ट्विट करुन मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, मुंबईकरांनी घरातच थांबावं अशी आमची विनंती आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. सर्व काळजी घ्या आणि समुद्रकिनारी किंवा पाणी भरलेल्या परिसरात जाऊ नका. गरज लागल्या १०० नंबरवर फोन करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.  मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला ही मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचाः वसई- विरारमधल्या नोकरदारांचे हाल, सलग दुसऱ्या दिवशी बस प्रवाशांना फटका

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलिस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

heavy rain mumbai police request mumbaikars stay home


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain mumbai police request mumbaikars stay home