मुंबईकरांनो सावधान! उद्या करावा लागणार अतिवृष्टीचा सामना?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- पुणे, सातारा, कोल्हापुरात उद्याही अतिवृष्टी होईल.

मुंबई : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किनारपट्टीसह मध्य आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मुंबईत उद्या (गुरुवार) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर कोकणात मुंबईसह इतर भागांत पावसाची विश्रांती असली तरीही गुरुवारी पालघरमध्ये अतिवृष्टी जोमाने होईल. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) त्याखालोखाल ठाणे, मुंबईत अतिवृष्टी होईल. परंतु पालघरच्या तुलनेत मुंबईत अतिवृष्टीचा जोर कमी असेल.

दक्षिण कोकणातही रायगडमध्ये अतिवृष्टीचा जोर दिसेल. त्या तुलनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अतिवृष्टीचे प्रमाण कमी असेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Mumbai Tomorrow