esakal | मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणी

- मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागात साचले पाणी.

मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तसेच या मुसळधार पावसामुळे दीड दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांना अडचण झाली.  

ठाणे, कल्याण, मुंबई, डोंबिवली, नवी मुंबई, मीरारोड, पालघर या भागात पाऊस बरसला. त्यामुळे माटुंगा, दादर, हिंदमाता, करीरोड, सायन, चिंचपोकळी, अंधेरी, विलेपार्ले या भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. 

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मात्र, रेल्वेसेवा सध्या सुरळीत आहे.

loading image
go to top