अतिवृष्टीचा मुंबईत इशारा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 8 आणि 9 जूनला मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या दोन दिवसांत उत्तर कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असतानाच दोन दिवसांत मॉन्सून राज्यात पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या मॉन्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे; तर आठवड्याच्या अखेरीस मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकणात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या या दोन दिवसांत अत्यावश्‍यक कामासाठीच घरांतून बाहेर पडा, असा सल्ला मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे. 

पावसाचा अंदाज 
6 जून : कोकणात अतिवृष्टी; तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पूर्वमोसमी पाऊस 
7 जून : कोकणात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी 
8 जून : दक्षिण कोकणतात अतिवृष्टी 
9 जून : उत्तर कोकणात अतिवृष्टी 

Web Title: heavy rain Mumbai Warning