#Monsoon पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अच्युत पाटील
सोमवार, 25 जून 2018

बोर्डी (पालघर) - परिसरात शनिवार दिनांक 23 जून रोजी सुरु झालेल्या पावसाने रविवारी सायंकाळ पासून, प्रचंड जोर धरला. गेल्या चोविस तासात स्थानिक पर्जन्य मापका नुसार 180 मीमी तर पावसाळा सुरू झाल्यापासून 328 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने येथील ग्रामस्थांची मात्र झोप उडवली. समुद्रात भरतीच्या पाण्याचा जोर नसल्याने फार नुकसान झाले नाही. परंतु, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या लाव्हरी पाड्याकडे जाणाऱ्या धुंडियापाडा ते लाव्हरीपाडा रस्त्यावर पाणी भरल्याने तेथील नागरिकांचा गावशी संपर्क तुटला अनेकांना कामावर जाता आले नाही.

रविवारी सकाळपासुन वातावरण ढगाळ आणि हवेत उष्णता वाढली होती. दुपारपासून हलक्या स्वरूपात पाऊस सूर झाला होता. मात्र सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरवात झाली. तासाभरातच नदीनाल्यात पाणी भरले. सोमवारी पहाटे तीन वाजता पुन्हा धुव्वाधार पावसाला सुरवात झाली. तत्पूर्वी वीज पुरवठा बंद पडला होता. सर्वत्र काळाकुट्ट अंधार आणि मुसळधार पाऊस अशा परिस्थितीत ग्रामस्थांची पार झोप उडाली.

Web Title: Heavy rain in Palghar district