अतिवृष्टीग्रस्त मुंबईकरांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली, भातखळकरांचे टीकास्त्र

Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkarsakal media

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी (heavy rainfall) राज्य सरकारने (maharashtra government) जाहीर केलेल्या 11 हजार 500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये (funding package) मुंबईकरांना (mumbaikar) कसलीही मदत न केल्याबद्दल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar criticizes) यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. (heavy rainfall-maharashtra government-funding package-mumbaikar-atul bhatkhalkar critisizes-nss91)

सरकारच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईचा उल्लेख नसून सरकारने पुन्हा यंदाही मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. 16 ते 18 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. सखल भागात पाणी साठल्याने चाळकरी, झोपडीवासीय रहिवासी-दुकानदार आदींचे सामानसुमान नष्ट झाले.

Atul-Bhatkhalkar
नशाबंदी प्रबोधनाच्या अनुदानात 30 लाखावरून 60 लाख रुपयांची वाढ - मुंढे

अनेक ठिकाणी दरडी-भिंती कोसळून 40 लोक मरण पावले तसेच घरांचे नुकसान आणि वित्तहानी देखील झाली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्येही हानी झाली. चेंबूर, मुलुंड येथे दरडी कोसळल्या, हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात हजारो घरांमध्ये पाणी शिरले. मात्र तात्काळ नजर पंचनामे करून मुंबईकरांना मदत करणेही सरकारला जमले नाही, अशी खरमरीत टीका भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना मदत करतानाच मुंबईतील बाधितांना मदत करणे सरकारला काहीच कठीण नव्हते. मुंबईकरांना मदत न करणे हे संतापजनक असून याबद्दल भाजप तर्फे राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. सरकारने अजूनही मुंबईकरांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा याप्रश्नी भाजपतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com