पाऊस आला.. मुंबई तुंबली.. पुन्हा तोच खेळ!

मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई : पाऊस येतो.. मुंबई तुंबते.. सर्वसामान्य माणूस तासनतास अडकून पडतो आणि पाऊस थांबल्यानंतरच शहर पूर्वपदावर येतं.. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही 'परंपरा' आजही (मंगळवार) कायम राहिली. यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा 'स्पिरिट ऑफ मुंबई' दाखविण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. 

काल रात्रीपासूनच मुंबईला पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर वाढल्यामुळे जागोजागी पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली होती. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका लाखो चाकरमान्यांना बसला. 

Image may contain: 3 people, child and outdoor

Image may contain: 1 person, outdoor

जोरदार पाऊस झाला की मुंबई तुंबते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यातच, अंधेरीमध्ये पादचारी पूल कोसळल्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात अजूनच भर पडली. या अपघातामुळे ऐन वर्दळीच्या वेळी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळानंतर चर्चगेट ते वांद्रे आणि गोरेगाव ते विरार अशी वाहतूक सुरू झाली.

पावसामुळे मध्य व हार्बर रेल्वे ठप्प आणि पूल पडल्याने पश्‍चिम रेल्वे बंद अशा कोंडीत सापडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हिंदमाता, किंग्ज सर्कल येथे पाणी तुंबल्यामुळे उपनगरातून दक्षिण मुंबईत जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला. 

Image may contain: 1 person, child and outdoor

'ट्‌विटर' काय म्हणतंय? 
प्रचंड वैतागवाण्या परिस्थितीमध्ये असतानाही अनेक ट्विटर युझर्सने तिरकस भाषेत मत व्यक्त केले.

Web Title: Heavy rains in Mumbai; water logging in the city