सावधान! रविवारी मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

रविवारी मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडातही अतिवृष्टीसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुर्गातही अतिवृष्टी होईल. मात्र मुंबई, पालघर, ठाणे आणि रागयगड जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त दिसून येईल.

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर अजून वाढणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. उद्या (रविवारी) मुंबईत पुन्हा अतिवृष्टी होईल, असा सतर्कतेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण कोकणात सोमवारपर्यंत पाऊस धुमाकूळ घालणार आहे.

रविवारी मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडातही अतिवृष्टीसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुर्गातही अतिवृष्टी होईल. मात्र मुंबई, पालघर, ठाणे आणि रागयगड जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त दिसून येईल.

शनिवारी दुपारनंतर पावसाने दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात ब्रेक घेतलाय. दादर, वडाळा पूर्व उपनगरांत चेंबूर, देवनार या भागांत पावसाच्या रिमझिम सरी सुरु आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains will increase in Mumbai on Sunday