पालघरमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पालघर - तांत्रिक बिघाड झाल्याने पालघरच्या कोळगाव येथील पोलिस परेड ग्राउंडच्या मोकळ्या जागेत एका हेलिकॉप्टरचे तातडीने लॅंडिंग करण्यात आले. यातील प्रवासी सुखरूप आहेत.

पालघर - तांत्रिक बिघाड झाल्याने पालघरच्या कोळगाव येथील पोलिस परेड ग्राउंडच्या मोकळ्या जागेत एका हेलिकॉप्टरचे तातडीने लॅंडिंग करण्यात आले. यातील प्रवासी सुखरूप आहेत.

जुहू येथून सुरतकडे जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दुपारी 2.15 वाजता हे हेलिकॉप्टर कोळगाव येथील खुल्या मैदानात उतरवण्यात आले. हेलिकॉप्टर उतरवल्यानंतर पायलटने मागच्या बाजूचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन जे. के. राव यांच्यासह आणखी एक वैमानिक होत्या; तसेच हझिरा स्टील प्लान्टमधील दोघे अधिकारीही होते. यात कुणालाही दुखापत झाली नाही. तीन वाजता या हेलिकॉप्टरचे पुन्हा उड्डाण झाले.

Web Title: helicopter emergency landing