हेलिकॉप्टर जॉय राइडला मिळेना मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : मुंबापुरीचे दर्शन अवकाशातून घेता यावे यासाठी सुरू केलेल्या आणि हेलिकॉप्टर अपघातानंतर बंद पडलेली 'जॉय राइड' सेवा पुन्हा केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा पर्यटकांना आहे.

मुंबई : मुंबापुरीचे दर्शन अवकाशातून घेता यावे यासाठी सुरू केलेल्या आणि हेलिकॉप्टर अपघातानंतर बंद पडलेली 'जॉय राइड' सेवा पुन्हा केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा पर्यटकांना आहे.

गोरेगाव येथे डिसेंबरमध्ये "मुंबई दर्शन'च्या जॉय राइडचे हेलिकॉप्टर कोसळून पायलट आणि पर्यटकाचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर जॉय राइडच्या सुरक्षिततेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. अपघातानंतर दोनच दिवसांत "आयआरसीटीसी'ने ही सेवा तात्पुरती बंद करण्याचे जाहीर केले होते, तर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) तात्पुरती स्थगित केलेली टूर पवनहंसच्या सहकार्याने लवकरच सुरू होईल, असे म्हटले होते.

राज्य सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे वर्ष "व्हिजिट महाराष्ट्र' म्हणून जाहीर केले आहे; परंतु जॉय राइड सेवा मात्र दीड महिना बंद आहे. या सेवेबद्दल पर्यटकांच्या मनात भीती आणि त्यांच्या प्रतिसादाबद्दल एमटीडीसीला साशंकता असल्यामुळेच ती सुरू होणे लांबणीवर पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पर्यटकांच्या मनातील भीती कमी झाल्यानंतरच ही सेवा सुरू करण्यात यावी, असा अधिकाऱ्यांचा विचार असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात आयआरसीटीसी अधिकाऱ्याने सांगितले, की अमन एव्हिएशनचा करार संपला आहे. पुन्हा निविदा काढण्यात आली आहे आणि आता कोटेशन पद्धतीने कॉन्ट्रॅक्‍ट देण्यात येणार आहे. साधारण मार्चमध्ये ही सेवा सुरू होईल.'' तर एमटीडीसी आणि पवनहंसच्या अधिकाऱ्यांनी जॉय राइड लवकरच सुरू होईल.

Web Title: helicopter joy ride halted