Video : पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची थरारक हवाई दृश्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

महापुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची हेलिकॉप्टरमधून घेतलेली दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. चहूबाजूंनी पसरलेला महापूर आणि त्यामध्ये दिसणारी रेल्वे हे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. 

मुंबई : महापुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची हेलिकॉप्टरमधून घेतलेली दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. चहूबाजूंनी पसरलेला महापूर आणि त्यामध्ये दिसणारी रेल्वे हे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. 

वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

उल्हास नदीला महापूर आला आहे. त्यामुळे वांगणी परिसर पाण्याखाली गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: helicopter view of Mahalaxmi railway at Mumbai