पोलिसांचं काम झालं कमी, आलं कोरोनाचे रुग्ण ओळखणारं विशेष हेल्मेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई : कोरोना व्हायरस जगभरात पसरत चालला आहे. भारतातही काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात एकूण ४८ लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता कोरोनापासून सावध राहण्याचा सल्ला शासनाकडून देण्यात येतोय.  आपण घरी राहून आपली कामं करू शकतो, कुणाच्याही थेट संपर्कात न राहता आपली कामं करू शकतो. मात्र दिवसरात्र आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसांचं काय? पोलिसांना सतत लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त भिती आहे. मात्र आता एका गोष्टीमुळे त्यांना या कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करता येणार आहे. 

हेही वाचा: ..म्हणून देखील मुंबई पोलिस आहेत एक नंबर ! बातमी वाचा,प्रतिक्रिया द्या...

सध्या सोशल मीडियावर पोलिसांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यात पोलिस एक हेल्मेट घालून दिसत आहेत. मात्र हे हेल्मेट साधंसुधं हेल्मेट नाही. हे 'स्मार्ट हेल्मेट' आहे. हे हेल्मेट घातल्यामुळे पोलिसांना कोणाच्याही शरीराचं तापमान कळू शकणार आहे. त्यामुळे कोणाच्या जवळ जाताना त्यांच्या शरीराचं तापमान काय आहे हे पोलिसांना कळू शकेल. त्यामुळे कोरोनाबाधित लोकांना पोलिस ओळखू शकतील.

कसं आहे हे हेल्मेट: 

हे हेल्मेट 'स्मार्ट हेल्मेट' आहे. या हेल्मेटमध्ये एक इन्फ्रारेड कॅमेरा बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या आधारे ताप असणारा तरुण जवळ आला तर लगेच समजू शकणार आहे. त्यानंतर जोरात अलार्म देखील वाजेल. यामार्फत पोलिसांना कोरोनाचं लक्षण किंवा कोण आजारी आहे हे समजू शकणार आहे. त्यामुळे पोलिस अशा लोकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करू शकतात. त्यामुळे पोलिस या कोरोनपासून पोलिसांना स्वतःचं संरक्षण करता येणार आहे. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जर अशा प्रकारचे हेल्मेट भारतात आले तर पोलिसांना या हेल्मेटचा नक्कीच फायदा होणार आहे.     

this Helmet can protect policemen from Corona virus and catch corona patients

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this Helmet can protect policemen from Corona virus and catch corona patients