महाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात

दिनेश गोगी
रविवार, 19 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य-कपडे-धान्याची मदत करणाऱ्या उल्हासनगरातील एक हात मदतीचा ही संस्था महाड तालुक्या मधील पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणासाठी धावली आहे. या विद्यार्थीनिला तिचे पालक व शिक्षका सोबत उल्हासनगरात बोलवून तिला उच्च शिक्षणासाठी आर्थिक सह संपूर्ण शिक्षणाचा संच-कपडे याशिवाय येण्याजाण्याचा खर्च अशा मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेने माणुसकीचे उदात्त उदाहरण घडवले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी एक हात मदतीचा या सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजय कदम हे त्यांच्या टीम सोबत महाड तालुका वरंध येथील आदिवासी वाडीत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गेले होते. तेंव्हा याच वाडीतील भारती लक्ष्मण मोरे ही आदिवासी विद्यार्थीनी दहावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिला उच्च शिक्षणासाठी महाड तालुक्यातील ऋषीतंत्र विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. पण तिचे आईवडील भातशेतीत मजुरी करत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने भारती उच्च शिक्षणा पासून वंचित राहणार आहे.

आदिवासी वाडीतील शिक्षक नामदेव सुतार यांनी विजय कदम यांना दिली होती.
विजय कदम उल्हासनगरात परतल्यावर त्यांनी संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांची बैठक घेऊन त्यांना पैशांअभावी उच्च शिक्षणा पासून वंचित राहत असलेल्या भारती मोरे या विद्यार्थिनीची कहाणी सांगितली.  त्या बैठकीत भारतीच्या उच्च शिक्षणाला मदतीचा हात देण्याचा निर्णय संस्थेने घेतला.  आज एक हात मदतीचा या संस्थेच्या कार्यालयात पदाधिकारी जयेश बेलदार, निखिल बिजवे, विनोद सोनार, सुरेंद्र पंजाबी, राहुल वायकर, शुभदा पिंपळे, जया जाधव, शारदा जाधव, निशा भारती मोरे, तिचे आईवडील आणि शिक्षक दामोदर सोनार यांना बोलवून भारतीला प्रवेशासाठी आर्थिक मदत, संपूर्ण शिक्षणाचा संच, तिच्या सोबत आईवडीलांना नवीन कपडे, चादरी, ब्लॅंकेट असा मदतीचा हात दिला आहे. आदर्श ग्रामपंचायत वरंधच्या सरपंच संगीता सपकाळ, उपसरपंच अश्विनी देशमुख यांनी रितसर पत्र देऊन आदिवासी विद्यार्थीनी भारती मोरे हिच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल एक हात मदतीचा या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजय कदम यांचे आभार मानले आहेत.
 
Web Title: help hand for higher education of Mahad tribal students