केरळ पूरग्रस्तांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत फेरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मोखाडा (पालघर) : राज्यपाल तथा कुलपती के. विद्यासागर राव यांनी केलेल्या, आवाहनाला प्रतिसाद देत मोखाड्यातील मोहीते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खोडाळा बाजारपेठेत केरळ पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली आहे. तसेच आपल्याला घरून, खर्चासाठी दिलेले पैसे ही विद्यार्थ्यांनी, पूरग्रस्तांना मदत देऊन हातभार लावला आहे. 

केरळमध्ये पूरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. संसार उघड्यावर आले आहेत. हे संसार सावरण्यासाठी, जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, राज्यातील विद्यालये, महाविद्यालये तसेच संस्थांनी ही केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात द्यावा असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती के. विद्यासागर राव यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, मोखाड्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खोडाळा बाजारपेठेत मदत फेरी काढून मदतीचे आवाहन केले. 

यावेळी खोडाळा बाजारपेठेतून 8 हजार 512 रूपये गोळा झाले आहेत. तर विद्यार्थ्यांना घरून खर्चासाठी दिलेले 1  हजार 914 रूपये विद्यार्थ्यांनी ही गोळा करून दिले आहेत. ही सर्व रक्कम मुंबई विद्यापीठाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या या मदत फेरीत महाविद्यालयाचे प्राचार्य सुधाकर गवंदे, संस्थेचे सचिव प्राध्यापक दिपक कडलग यांसह कर्मचारी सहभागी झाले होते. 

Web Title: help for kerala floods students on rally