पोलादपूर दुर्घटनेत सहकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला संस्थांचा मदतीचा हात

दीपक घरत
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पनवेल :  पोलादपूर दुर्घटनेत सहकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्सला संस्थांचा मदतीचा हात घाटात खराब वातावरणात जीवाची बाजी लावत शेकडो फूट खोलीतून मृतदेह बाहेर काढलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सचा सत्कार पनवेल मधील सामाजिक संघटनंनी केला असुन, या ट्रेकर्सना आर्थिक मदतीचा हात देखील या संघटना दिला आहे. पनवेल मधील मयुर भोईर शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास संस्था तसेच क्रांतीज्योत मित्र मंडळ शिरढोण यांच्या मार्फत महाबळेश्वर येथे मृतदेह काढणाऱ्या ट्रेकर्सची भेट घेऊन ट्रेकिंगसाठी आत्याधुनिक साधनसामुग्री खरेदी करता २५ हजारांची मदत करण्यात आली.

संस्थानी दिलेल्या आर्थिक मदतीचा वापर करून या ट्रेकर्सना अत्याधुनिक साहित्य, रोप आदींसह ट्रेकसाठी लागणा-या महत्वाच्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मयूर भोईर, भरत भोईर, राजन भगत, लहू कातकरी, अशोक मुंडकर आदी सदस्य उपस्थित होते तर महाबळेश्वर ट्रेकर्सग्रुपच्या वतीने बाबा बांठिया, अनिल केळगणे, निलेश बावळेकर, सनी बावळेकर, आदी सदस्य उपास्थित होते .

ट्रेकर्सनी सांगितले आपले अनुभव
महाबळेश्वर ट्रेकर्सनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या घटनेत मदकार्य पोहचविले आहे. यामध्ये दासगांव, जुई-महाड, माळीण गांव भुस्खलन, मांढरदेवी चेंगराचेंगरी, पसरणी घाट, विशालगड, महाड येथील सावित्री नदी पुल दुर्घटना, अंबनेळी बस दुर्घटना आदींचा समावेश आहे. यावेळी महाबळेश्वर ट्रेकर्सनी अंबनेळी घाटातील थरारक प्रसंगातला आपला अनुभव कथन केला. 
      
स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे महाबळेश्वर हे ट्रेकर्स हे खरे  हिरो आहेत . त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. याकरिता आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.
- मयूर भोईर, समाजसेवक.

Web Title: The help to the Mahabaleshwar trekkers who cooperate with the collision of the Poladpur Accident