वीटभट्टी कामगारांच्या परिवाराला मदतीचा हात

दिनेश गोगी
रविवार, 6 मे 2018

उल्हासनगर - ग्रामीण भागात येणाऱ्या तब्बल 13 तालुक्यांमध्ये जाऊन तेथिल आदिवासी नागरिकांच्या वाड्यांना, तसेच शाळांना भेटी देणे. तसेच, त्यांना विविध लोकोपयोगी वस्तूंच्या मदतीच्या हात देण्याचा उपक्रम राबवणाऱ्या उल्हासनगरातील "एक हात मदतीचा" या सामाजिक संस्थेच्या वतीने आज कँप नंबर 5 परिसरातील आदिवासी वीटभट्टी कामगार व त्यांच्या परिवाराला धान्य वस्त्र व बच्चेकंपनीला खाऊच्या मदतीचा हात देण्यात आला.

अनपेक्षितरित्या मिळालेल्या वस्तूंनी वीटभट्टी कामगारांचा परिवार सुखावला आहे. 

संस्थेचे अध्यक्ष विजय कदम त्यांची मुलगी निर्मयी कदम, उपाध्यक्ष रवि वलेचा, जयेश बेलदार, अप्पा मुंडे, विजय नकले, विनोद सोनार, अरुण गायकवाड, यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. 

हे काम एकट्याचे नसून संयुक्तिक आहे. नागरिक देत असलेले जुने कपडे, चादरी, बूट, धान्य थोडेफार आर्थिक सहकार्य तिथे पोहचवण्याचे काम "एक हात मदतीचा" या संस्थेच्या वतीने केले जाते. हे काम पुढेही अविरत सुरूच ठेवणार असल्याची माहिती विजय कदम यांनी दिली.

Web Title: Helping the family of Veetabhati workers