अजूनही माणसुकी जिवंत आहे; त्याला मिळाला मदतीचा हात...

अजुनही माणसुकी जिवंत आहे, त्यांनी दिला त्याला मदतीचा हात...
अजुनही माणसुकी जिवंत आहे, त्यांनी दिला त्याला मदतीचा हात...

मुंबई : संपूर्ण देशामध्ये "कोरोना' विषाणूचे संकट आहे. प्रत्येक नागरिक भयभीत झालेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये निर्बंध घातले जाते. प्रत्येक अनोळखी व्यक्तीला संशयाने पाहिले जाते. अशा गंभीर परिस्थितीमध्ये काही जण माणुसकी जपत आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थी गेल्या पाच महिन्यांपासून देशभरातील कलेचे दस्तावेजीकरण करण्यासाठी देशभ्रमंती करत आहे. "कोरोनो'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्याच्यावर पुन्हा महाराष्ट्रात परतण्याची वेळ आली होती; परंतु या कलाप्रवासात ओळख झालेल्या बंगालमधील कलाकार सायन चक्रवती यांनी माणुसकी दाखवत परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रतीकला स्वतःच्या घरी राहण्यास सांगितले. 

"कोरोना'मुळे येथे रक्ताचे नाते पणाला लागते... असा अनुभव एकीकडे असताना केवळ चार-पाच दिवसांची ओळख, पण आपल्याकडे आलेला अतिथी संकटात सापडलेला आहे असे कळताच "आहे त्या स्थितीतून मागे फिरा आणि माझ्या घरात आश्रय घ्या...' अशी माणुसकीची हाक बंगालचे सायन चक्रवती यांनी प्रतीकला दिली. प्रतीक जाधव आणि त्याचे तीन सहकारी सध्या पश्‍चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे कलाकार सायन चक्रवती यांच्या घरी सुरक्षित थांबले आहेत. आतापर्यंत प्रतीकने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथे कलांचे दस्तावेजीकरण केले. प्रवासादरम्यान, प्रतीक व त्याचे सहकारी आसाममध्ये पोहोचले. तेव्हा त्यांची आसाममधील आरोग्य विभागाने कोरोनाची तपासणी केली. त्यात त्यांचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. तसेच त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करण्यात येत होती.

या अनुभवाबाबत प्रतीक म्हणाला, "आम्ही कोणीच आंतरराष्ट्रीय प्रवास केला नाही, आम्ही सायकलने प्रवास करतोय. हे आम्ही त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पटवून दिले; परंतु ते ऐकत नव्हते. अखेर त्यांचा मुख्य अधिकारी आला, त्यांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय प्रवास केला असेल तर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. त्यांनी आम्हाला कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दिले आणि आमची सुटका केली.'' या परिस्थितीत आपल्या राज्यात परत जायचे का? मग आपल्या कला प्रवासाचे काय होणार? या सर्व चितेंत असताना सायन चक्रवती हे आमच्यासाठी देवासारखे धावून आले आणि मायेचा आधार दिला, असेही प्रतीक म्हणला. 

ही बातमी वाचली का? एपीएमसीतील भाजीपाला मार्केट उद्यापासून बंद राहणार

ही परिस्थिती बंगालमधील सायन चक्रवती यांना समजली, त्यांनी प. बंगाल जलपाईगुडी येथे येण्यास सांगितले. सर्व परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रतीक आणि त्याचे सहकारी तेथेच मुक्काम करणार आहेत. एका अनिश्‍चित काळासाठी आज माझा कलाप्रवास थांबवावा लागत आहे, पण ते अपरिहार्य आहे. म्हणतात ना... उंच भरारी घेण्यासाठी चार पावले मागे यावी लागतात, तसेच आज माझा थांबलेला प्रवास तसाच आहे. सर्व परिस्थिती स्थिर झाल्यावर नव्या जोमाने कलाप्रवास सुरू होईल, भारतातील कलावैभव या निमित्ताने पहिल्यांदाच समोर येणार आहे, असे प्रतीकने सांगितले. 

प्रवास खंडित झाल्याने खर्च आता वाढेल, पुन्हा सर्व नियोजन करावे लागेल. ठरलेल्याप्रमाणे कलाप्रवास प्रकल्प पूर्ण करता येणार नाही, याचे वाईट वाटते; परंतु देशावर परिस्थिती अशी आली आहे की, थांबण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत सायन चक्रवती यांच्यासारखी माणुसकी जपणारी माणसं भेटणे दुर्मीळ आहे. अशा कठोर परिस्थितीत लोकांनी आपल्यातील माणुसकी ढळू देऊ नका, सुरक्षित अंतर ठेवून मदत करा, असे आवाहन प्रतीकने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com