एचआयव्ही रूग्णांना दिलासा

एचआयव्ही रूग्णांना दिलासा

मुंबई, ता.२८ : मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे एचआयव्ही रूग्णांसाठी एक विशेष हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. तिच्या सहाय्याने एचआयव्ही रूग्णांना औषधे मिळणार आहेत.


हे वाचा : या तारखेला भारत कोरोनामुक्त होणार
कोव्हिड - 19 आणि लॉकडाऊनच्या पाश्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एचआयव्हीग्रस्तांना अत्यावश्यक अशी एआरटी (अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट) औषधे त्याच्या नेहमीच्या केंद्रावर जाऊन घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे अशा व्यक्तींच्या उपचारामध्ये खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे.


काय सांगता : सिगारेट ओढळ्याने कोराना दूर?
एचआयव्ही संसर्गित रुग्णांमध्ये कोव्हिड 19 आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असतो. यावर उपाय म्हणून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे एचआयव्ही बाधित रुग्णांना एआरटी उपचार त्यांच्या जवळच्या सरकारी अथवा महापालिका रुग्णालयांमध्ये करण्यात येत आहेत. तसेच, त्यांना दूरध्वनीवरून नजीकच्या रुग्णालयाची माहिती आणि हा प्रवास शक्य नसल्यास वस्तीजवळ औषधवाटप संबधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरीही जवळच्या केंद्राविषयी किंवा संबंधित इतर कुठल्याही माहितीसाठी ' एटीआर एमआयटीआर - 022 - 48972305' या विशेष हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com