मुंबईकरांसाठीच्या हायटेक 'वंदे मेट्रो'मध्ये असणार 'या' सुविधा! २० हजार कोटी खर्च अपेक्षीत!

Vande metro
Vande metro

मुंबई : मुंबईची लाईफ-लाईन अशी ओळख असणाऱ्या लोकल सेवा हायटेक होणार आहे. विशेष म्हणजे परदेशाच्या धर्तीवर हायटेक वंदे मेट्रो ( लोकल ) मुंबईत धावणार आहे. रेल्वे बोर्डाने शुक्रवारी रेल्वे विकास महामंडळाच्या एमयुटीपी प्रकल्पातर्गत २३८ वंदे मेट्रो लोकल बांधणीला रेल्वे बोर्डाने मजुरी दिली आहे.

Vande metro
Accident News : तुरीने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला; रात्रीच्या सुमारास घडली घटना

वंदे मेट्रो लोकल बांधण्यासाठी साधरणतः २० हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. वंदे मेट्रोमुळे मुंबईकरांना प्रवास वेगवान होणार असून अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.

मेड इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनपाठोपाठ रेल्वे बोर्डाने वंदे भारत मेट्रो ट्रेनची बांधणी सुरू केली आहे. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांचा सेवेत दाखल होईल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पना जाहीर केली होती.

आता रेल्वे बोर्डाने शुक्रवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत २३८ वंदे मेट्रो (उपनगरी) बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र रेल्वे मंडळाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला शुक्रवारी पाठवले. या वंदे मेट्रोला उपनगरी लोकल सेवा म्हणून चालवण्यात येणार आहेत.

Vande metro
Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मोठी अपडेट, NCB चा गंभीर आरोप!

कारेशड उभारणार

वातानुकूलित वंदे मेट्रो लोकलचा देखभालीसाठी मुंबई महानगर प्रदेशात दोन नवीन कारशेड उभारण्यात येणार असून यासाठी जागेची निश्चिती करण्यात आलेली. मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तंत्रज्ञान भागीदाराद्वारे वातानुकूलित वंदे मेट्रो लोकलची बांधणी करण्यात येणार आहेत.

सर्व लोकल होणार वंदे मेट्रो -

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत.

२० हजार कोटीचा खर्च

वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे मेट्रो रेल्वे उपनगरी मार्गासाठी बांधण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे २० हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान या लोकलच्या देखभालीसाठी वाणगाव आणि भिवपुरी येथे कारशेड उभारण्यात येणार आहेत. यासाठी जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे, असे एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वंदे मेट्रो म्हणजे काय ?

विशेष म्हणजे,वंदे मेट्रो ही वंदे भारत ट्रेनची एक छोटी आवृत्ती आहे. जी कमी अंतर असलेल्या दोन शहरांदरम्यान चालवली जाणार आहे. केंद्र सरकारने २०२२-२३च्या अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा केली होती. या ट्रेनद्वारे १०० किमीपेक्षा कमी अंतराची दोन शहरे जोडली जातील. मोठी लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये वंदे मेट्रो ५० ते ६० किलोमीटर दरम्यान चालवली जाणार असल्याची योजना आहे. विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर रेल्वेने वंदे मेट्रो लोकल सुरू होणार आहे.

या ट्रेनसाठी लोकांना प्रीमियम लोकल ट्रेनची सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही ट्रेन प्रामुख्याने त्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल जे शहरांमध्ये काम करतात आणि दररोज जवळच्या शहरांमधून मोठ्या शहरात कामासाठी येतात. या ट्रेनमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहे.

या सुविधेने सुस्सज असणार ‘वंदे मेट्रो’

- स्वयंचलित दरवाजे

- पूर्णत: व्हेस्टिब्युल कोच असलेल्या वातानुकूलित

- सध्याच्या व्यवस्थेनुसार प्रथम किंवा द्वितीय श्रेणी नाही.

- ट्रेनच्या दोन्ही टोकांना स्वतंत्र एसी व्हेंडर कपार्टमेंट

- सध्याच्या ईएमयू गाड्या आणि मॉड्युलर एर्गोनॉमिकल आसनव्यवस्था

- महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबे

- डब्यांमध्ये एलईडी दिवे

- प्रवाशासाठी डिजिटल डिस्प्ले पॅनेल आणि स्टेशन इंटीकेटर

- इमर्जन्सी एग्रेस सिस्टीम

- सीसीटीव्ही आणि पॅसेंजर टॉक बॅक प्रणाली

-कोचेसमध्ये स्टेनलेस स्टील फिटिंग

“वंदे मेट्रो’ची वैशिष्ट्ये

- शंभर किमीपेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांमध्ये धावणार

- वंदे मेट्रो ही कमी अंतराची आवृत्ती असणार

- मुंबईकरांना जलद शटलसारखा अनुभव देणार .

- वंदे मेट्रो ट्रेनला आठ डबे असणार

- वंदे भारतापेक्षा वंदे मेट्रोची गती जास्त असणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com