मुंबईत हाय अलर्ट; पुढच्या दोन दिवसांत 'अतिमुसळधार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मुंबई :  हवामान विभागाने मुंबईत हाय अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुंबईत अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. 

मुंबईच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. घाटकोपर मुलुंड, भांडुप, ठाणे, कल्याण, पालघर, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली अशा अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच किनारपट्टी भागावरही हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Alert Heavy Rain Expected On Saturday Sunday Weather Department K S Hosalikar