Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! भरतीच्या लाटा 16 फूट उंच उसळणार...

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

आज (ता. 3) मुंबईत दुपारी 1 वाजून 44 मिनिटांदरम्यान 4.9 मिटरची म्हणेच 16 फूट उंच भरतीच्या (हाय टाइड) लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुने मुंबईकरांना आज हैराण केले आहे. त्यातच भर म्हणजे आज (ता. 3) दुपारी 1 वाजून 44 मिनिटांदरम्यान 4.9 मिटरची म्हणेच 16 फूट उंच भरतीच्या (हाय टाइड) लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.

समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलाय. त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे स्थानकांवर पाणी शिरल्याने लोकलही उशीराने धावत आहेत.

मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली सगळीकडेच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High alert to Mumbai citizens for high tide