उच्च न्यायालयात महिला दिन साजरा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू ललिता बाबर हिचा "ऍडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया'च्या वतीने सत्कार करण्यात आला. 

मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते ललिताला गौरवण्यात आले. या वेळी सौंदूबोलडाटा, मृदुला भाटकर, साधना जाधव, अनुजा प्रभुदेसाई, शालिनी फणसाळकर-जोशी आदी न्यायमूर्ती उपस्थित होत्या. 

मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी लवकरच न्यायालयातील कर्मचारी आणि वकील महिलांच्या सोईकरता पाळणाघर सुरू करणार असल्याची माहिती दिली. जवळच्याच "सीटीओ' इमारतीत त्याकरता 900 चौरस फुटांची जागा आरक्षित केल्याचे त्यांनी सांगितले. 

सदैव तटस्थपणे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायमूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच झलक या वेळी दिसली. न्यायमूर्ती मृदुला भाटकर या उत्तम कवयित्री आहेत. मात्र, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, सौंदूबोलडाटा यांनाही उत्तम कविता सुचतात, याचा प्रत्यय या वेळी आला.

Web Title: High Court celebrated Women's Day