पुस्तकांचे 'डाएट' न्यायालयाला नामंजूर!

schoolchildren.jpg
schoolchildren.jpg

मुंबई : मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे आजच्या काळात कमी झाले आहे, असे म्हणत, पुस्तकांचे वजन कमी करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. आमच्या वेळेस पुस्तकांचे वजन खूप असायचे पण आम्हाला कधी पाठदुखीचा त्रास झाला नाही, असा टोलाही न्यायालयाने लगावला. 

मुलांच्या दप्तरांमधील पुस्तकांचे वजन वाढले असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखीसह अनेक आजारांचा लहानपणापासूनच सामना करावा लागत आहे. त्यामुळे वही-पुस्तकांचे वजन कमी करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी न्यायालयात केली आहे. याचिकेवर मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. वह्या-पुस्तकांचे वजन वाढल्याचा दावा खंडपीठाने अमान्य केला.

राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन परिषदेसह अन्य संबंधित शालेय पुस्तक प्रकाशन संस्थांकडून आता पुस्तकांचे स्वरुप बदलले असून वजन कमी केले आहे, असेही न्यायालय म्हणाले. कौन्सिलच्या संकेतस्थळावरील नियमावलीचा अभ्यास करुन जर काही आक्षेपार्ह याचिकादाराला वाटले तर ते पुन्हा याचिका करु शकतात, अशी मुभाही न्यायालयाने याचिकादार पाटील यांना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com