कोरोना रूग्णांसाठी 'हाय फ्लो ऑक्सिजन थेरेपी' डिव्हाईस ठरतंय अत्यंत फायदेशीर

कोरोना रूग्णांसाठी 'हाय फ्लो ऑक्सिजन थेरेपी' डिव्हाईस ठरतंय अत्यंत फायदेशीर

मुंबई - कोरोना रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा, श्वासासंबंधी त्रास, कफ यांसारखे अनेक त्रास उद्भवतात. यावर नियंत्रण आणणारे डिव्हाईस तयार करण्यात आले आहे. एमआयआयसी आणि आयआयटी कानपूर येथील इन्क्युबेटी कंपनी नोक्का रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ने हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाईस लॉन्च केले आहे. हे अत्याधुनिक उपकरण कोरोना रूग्णांच्या  उपचारात प्रभावी ठरत आहे.

नोकार्क एच 210 हे हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाईस कोरोनाच्या रूग्णांची वाढती गरज भागवत आहे. एचएफओटी नेजल कॅनुलाद्वारे  रूग्णांना आर्द्रतायुक्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचें प्रमाण वाढतं. हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी मध्ये ओरल सक्शन देत कफ बाहेर काढण्याची प्रक्रीया अत्यंत सोपी आहे. 

गरम आणि आर्दतायुक्त गॅस एपिथिलियल म्युको - सिलिअरी देखील वाढवते. त्यामुळे श्वासासंबंधी समस्या, उदा. न्युमोनिया आणि डेलिरियम यांचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. एचएपओटी मध्ये कॅनुलाचा वापर केल्यामुळे रूग्णाला आरोग्य कर्मचा-यांशी बोलणे सोपे जाते. आणि इंट्यूबेशनमुळे रूग्णाला होणा-या टॉमोफोबियाची जोखीमही कमी होते. 

सर्वो ह्युमिडीफायर सह नोकार्क एच 210 विशिष्ट नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीवर ऑक्सिजन पुरवठा करते. अत्याधिुक तंत्रज्ञानाच्या मदतीने  नोकार्क एच 210 मध्ये सहज उपयोगासाठी 4.3 इंचाचे एक टच स्क्रीन इंटरफेस ,उच्च आणि निम्न दबावातील ऑक्सिजनसाठी इनपूट असलेले इलोक्ट्रॉनिक एफआयओ 2 कंट्रोल आणि एक टर्बाइनचे फ्लो जनरेटर आहे. या उत्पादनात सर्वसमावेशक हिटर आणि दोन तापमान सेंसर्स देखील आहेत. या बहुगुणी उपकरणात एक ज्येष्ठ आणि पेडीयाट्रीक मोडदेखील आहे. यामुळे आरोग्य सेवेतील व्यवसायिकांना वेगवेगळ्या फ्लो रेटमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ अशा दोघांवरही वापर करण्याची मुभा मिळते. 

हे डिव्हाईस रूग्णामधील ऑक्सिजन देण्याची स्थिती सुधारणे, इंट्यूबेशन कर्णयःची गरज कमी करणे, तसेच टोमोफोबिक अनुभव कमी करते. यामुळे व्यक्तीला सहजपणे श्वास घेण्यास मदत मिळते असे नोक्का रोबोटिक्सचे सीईओ निखिल कुरेले यांनी सांगितले. शिवाय हे डिव्हईस श्वासासंबंधी तीव्र आणि गंभीर आजार असलेल्या रूग्णांना जास्तीत जास्त आराम देते. 

सध्या कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बाजारात एचएफएनसी उपकरणांची मागणी वाढत आहे.हे डिव्हाईस  वापण्यासाठी सोपे आहे एवढच नाही तर रूग्णांना खूप जास्त किंवा खूप कमी ऑक्सीजनचा पुरवठा होत असल्यास आरोग्य कर्मचा-यांना अलर्ट अलार्म देखाल देण्यात आला आहे. त्यामुऴे इतर उपकरणांच्या तुलनेत हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी अधिक प्रगत सिद्ध होईल असे ही कुरेले पुढे म्हणाले.  

( संकलन- सुमित बागुल )  

high flow oxygen therapy device is beneficial for covid19 patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com