महामार्गावर खड्डे बुजवण्याला वेग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - पावसाने घेतलेल्या विश्रांतीचा सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरेपूर फायदा घेत बुधवारी दिवसभर शीव-पनवेल महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम केले. खड्डे पडलेल्या ठिकाणी खडी व ग्रीटचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. काही ठिकाणी खोल खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आला.

बुधवारी बकरी ईदच्या सुट्टीमुळे रस्त्यावरील कमी वर्दळ व पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम करता आले. मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने कामोठे येथील उड्डाणपुलाखाली, कोपरा उड्डाणपूल, सीबीडी-बेलापूर उड्डाणपूल, सीबीडी खिंड, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी सिग्नल व वाशी टोल नाका परिसरादरम्यान खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला.

कोंडी कायम
सानपाडा उड्डाणपुलाजवळ व सीबीडी खिंडीत मोठे खड्डे पडल्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या मदतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: high speed of the potholes on the highway