मुंबईत उन्हाचा कडाका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर कमाल तापमानात वाढ झाली आहे. दोन दिवसांत मुंबईचे कमाल तापमान 33.2 अंशांवर पोहोचल्याची नोंद रविवारी झाली. शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअसवर होते. 

वाढत्या पाऱ्याची झळ रविवारी मुंबईकरांना अनुभवायला आली. दुपारपर्यंत पाऊस गायब असल्याने सूर्यप्रकोपाने अंगाची लाहीलाही झाल्याने घराबाहेर पडलेला मुंबईकर हैराण झाला होता. दिवसभर पाऊस गायबच राहिल्याने वाढती गरमी प्रवासादरम्यान मुंबईकरांना हैराण करत होती. 

मुंबई वगळता कोकणातील इतर भागांत पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. कोकणात जोरदार कोसळणारा पाऊस गुरुवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. कोकण वगळता राज्यातील इतर भागांत गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. 

मुंबईत हलक्‍या सरी 
कोकणात सध्या राजापूर, चिपळूण, मोखेडा, भिरा, देवगड, गुहागर येथे पावसाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. कर्जत, अलिबाग, खेड, पालघर, श्रीवर्धन येथेही पावसाची संततधार सुरू आहे. वेधशाळेच्या नोंदीत कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा जोर दिसून येत होता. मंगळवारनंतर कोकणातील बुहतांश भागांत जोरदार पाऊस सुरू राहील. मुंबईत मात्र पुढील दोन दिवस अधूनमधून हलक्‍या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. 

मुंबईतील गेल्या तीन दिवसांचे तापमान 
वार कमाल (अंश सेल्सिअसमध्ये) किमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

शुक्रवार 30.3 24 

शनिवार 32.4 22.1 

रविवार 33.2 23.7 

Web Title: high temperature in mumbai