हिजाबला विरोध केल्याने विद्यार्थिनीची याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - हिजाब घालून येण्यास परवानगी न देणाऱ्या भिंवडीमधील महाविद्यालयाविरोधात एका विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.

मुंबई - हिजाब घालून येण्यास परवानगी न देणाऱ्या भिंवडीमधील महाविद्यालयाविरोधात एका विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.

भिंवडीमधील होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयामध्ये सामायिक प्रवेश परीक्षेमार्फत (सीईटी) प्रवेश घेतला आहे. या वर्षी विद्यार्थिनीला लेखी परीक्षेला बसण्यास साई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने मनाई केली. तिची उपस्थिती कमी असल्याकारणाने तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाही, असे कारण महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे. महाविद्यालयाने हिजाब घालून येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेक दिवस गैरहजर राहावे लागले, असा खुलासा याचिकादार विद्यार्थिनीने केला आहे.

Web Title: Hijab oppose student petition high court