Photo : जगातील सर्वात डेंजर मनुष्याचं बँकेला पत्र...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

मुंबई - हल्लीचा सोशल मीडिया एवढा फास्ट झालाय की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज तुम्हाला येतो. ही गोष्ट आहे असाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पत्राची. या पत्रात एका इसमाने बँकेला एक 'डेंजर' पत्र लिहिलंय. आता, आम्ही हे पत्र डेंजर आहे हे अशासाठी म्हणतोय, कारण त्या पत्राच्या शेवटी या इसमाने 'मी सर्वात डेंजर मनुष्य' आहे असं नमूद केलंय. 

मोठी बातमी - या फोटोतील सरडा शोधा..

आता जाणून घेऊया किस्सा : 

या पत्रातील मजकुरानुसार या इसमाने बँकेला हे पत्र लिहिलंय. आपले बँकेतून पैसे कट झाले किंवा बँकेने आपल्या न सांगता कोणता दंड लावला किंवा आपल्याला कर्ज घ्यायचं असेल, बँकेची काही सुविधा घ्यायची असेल तर आपण बँकेला अर्ज करतो किंवा पत्र लिहितो. मात्र या 'डेंजर मनुष्याने' बँकेतील कर्मचारी आपल्याला 'काका' म्हणतात म्हणून बँकेच्या मॅनेजरला फैलावर घेतलंय. 

पत्रात काय लिहिलंय  
"मॅनेजर साहेब, आपल्या बँकेतील लोक, कर्मचारी कसे आहेत ते मला पूर्वीपासून माहिती आहे. तरी माझे वय 43 असून आताच मी 22 वर्षाच्या मुली बरोबर लग्न केलं आहे. तरी मला काका म्हणून माझा अपमान करू नये. नाहीतर मी जेव्हा अपमान करेन तेव्हा बघा. मी जगातला सर्वात डेंजर मनुष्य आहे मी" 

No photo description available.

No photo description available.

मोठी बातमी - ​ व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर..

पुण्यातील घोले रोडवरील जनता बँकेला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलंय.  हे पत्र सोशल मीडियात तुफान व्हायरल होतंय, अनेक व्हाट्सएप ग्रुपवर शेअर होतंय. दरम्यान या पत्राची सत्यता अजूनही समोर आली नाही.  

hilarious letter written by a man to bank manages must watch 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hilarious letter written by a man to bank manages must watch