कल्याण : शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली; मनसेच्या रॅलीत हिंदू - मुस्लिम ऐक्य

Shivjayanti
Shivjayantisakal media

डोंबिवली : शिवाजी महाराजांची जयंती (Shivjayanti) तारखेनुसार न करता तिथीनुसार साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले होते. त्यानुसार डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागात मनसेच्यावतीने (MNS) शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम (cultural event), बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण ग्रामीण येथील शिवजयंतीनिमित्त आयोजित रॅलीत हिंदू, मुस्लिम बांधवांनी एकत्र (hindu muslim unity) येत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना केल्याचे पहायला मिळाले.

Hindu muslim unity in shivjayanti
Hindu muslim unity in shivjayantisakal media

मनसे डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्यावतीने डोंबिवलीत सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी मध्यवर्ती कार्यालयातील शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी भागशाळा मैदान ते नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. ढोल ताशांचे वादन करत बाईक रॅलीची सुरुवात झाली. यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत यांसह अनेक मनसैनिक, शिवप्रेमी सामिल झाले होते. महिलांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरत होती. स्वामी समर्थ मठ या ठिकाणी बाईक रॅलीची सांगता झाल्यानंतर शाहीर कृष्णाकांत पाटील यांचा पोवाडा सादरीकरण झाले. यावेळी शिवप्रेमींनी शिव गर्जना करीत परिसर दणाणून सोडला.

Shivjayanti
राज्याला मोठा दिलासा! आढळले दोन वर्षातील सर्वात कमी रुग्ण

हिंदू - मुस्लिम ऐक्य

डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण भागात शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळाला. आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्यावतीने निळजे येथे शिवजयंती निमित्त मिरवणूक रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते रॅलीत सहभागी झालेले मुस्लिम बांधव. धर्मनिरपेक्षता ही शिवाजी राजे यांची शिकवण असून आजही ती माणसांमध्ये जिवंत आहे. शिवजयंती निमित्त हीच खरी शिवाजी महाराजांना मानवंदना ठरणार असल्याचे यावेळी विनोद पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com