उद्योगपती हिरानंदानी यांचे बनावट फेसबुक प्रोफाइल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई - उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केल्याप्रकरणी पवई पोलिसांत फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरानंदानी यांच्या नावाने फेसबुकवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून बनावट व्हॉट्‌सऍप अकाउंटही सुरू असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लक्षात आल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हिरानंदानी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी याचे काही दिवसांपूर्वी नाव, फोटो आणि इतर माहितीच्या आधारावर फेसबुकवर अकाउंट सुरू केले. आरोपीने हिरानंदानी यांच्या फेसबुकच्या खऱ्या अकाउंटची हुबेहूब नक्कल केली आहे. त्याचबरोबर हिरानंदानी यांच्या मोबाईल क्रमांकाशी मिळता-जुळता क्रमांक सुरू केला. त्यावर निरंजन यांच्या छायाचित्राचा वापर केला होता. या दोन्ही बनावट खात्यांवरून आरोपी हिरानंदानी यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. हिरानंदानी यांच्या बनावट फेसबुक खात्यावर अनेकांनी त्यांना "फ्रेंड रिक्वेस्ट'ही पाठवल्या. हिरानंदानी यांच्या जवळच्या व्यक्तीला याबाबत संशय आला. त्यांनी हिरानंदानी यांच्या आयटी विभागाकडे या खात्यांची चौकशी केली. तेव्हा ही फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्यात आली.

Web Title: Hiranandani fake Facebook profile