इतिहास अभ्यासक वि. ह. भूमकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

ठाणे : विद्यार्थीप्रिय शिक्षक, क्रिकेट प्रशिक्षक, व्याख्याते; तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक विनायक ऊर्फ वि. ह. भूमकर (76) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

भूमकर हे पोटाचा अल्सर व त्यानंतर काचबिंदू अशा व्याधी जडल्याने गेल्या तीन वर्षांपासून आजारी होते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निरंजन डावखरे, साहित्यिक प्रवीण दवणे, प्रा. प्रदीप ढवळ, खासदार राजन विचारे, इतिहाससंशोधक सदाशिव टेटविलकर यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी व नात असा परिवार आहे.

भूमकर हे मूळचे मराठवाड्यातील औरंगाबादचे. हैदराबाद, औरंगाबाद आणि परभणी येथे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. ते उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्याने त्यांना हैदराबाद संघातर्फे खेळण्याची संधी मिळाली होती. बी.ए.बी.एड्‌. पूर्ण केलेल्या भूमकर यांनी औरंगाबाद, फुलंब्री येथे काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते मुंबईत आले.

सलग 36 वर्षे त्यांनी अध्ययनाचे काम केले. त्यात 3 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाचे ते व्याख्याते होते. त्यांच्या उत्कृष्ट व्याख्यानाबद्दल मुंबई विद्यापीठाने त्यांचा गौरवही केला होता. काही शिक्षकांच्या मदतीने ठराविक रक्कम बॅंकेत ठेवून त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी दत्तक योजनाही त्यांनी राबविली होती.

समाजातील वंचित विद्यार्थ्यांसाठी सुशिक्षित दानशूर माणसे (सुदामा) ही योजनाही राबविली. घारापुरीची अक्षरशिल्पे, भटकंती, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मॉरिशस येथे झालेल्या स्वा. सावरकर साहित्य विश्‍वसंमेलनासह अनेक देशांत त्यांनी व्याख्याने दिली. ठाण्यात झालेल्या धर्म तत्त्वज्ञान संमेलनाचे त्यांनी दोन वेळा अध्यक्षपद भूषविले होते.

ठाणे जिल्हा परिषदेच्या "आदर्श शिक्षक' पुरस्कारासह "दी. वि. आचार्य', "नवरत्न', "ठाणे भूषण' पुरस्कार; तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या "जनकवी पी. सावळाराम' पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History Expert V. H. Bhumkar died