बोर्डी - रेल्वेफाटकाला टेम्पोचालकाने ठोकर मारल्याने फाटकाचा रॉड वाकडा

अच्युत पाटील
शनिवार, 17 मार्च 2018

बोर्डी : पश्चिम रेल्वेवरील घोलवड-उंबरगाव रेल्वेस्थानका दरम्यान असलेल्या बोर्डीरोड रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील रेल्वेफाटकाला एका टेम्पोचालकाने ठोकर मारल्याने फाटकाचा रॉड वाकडा झाला.

ही घटना शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले असतानाच अचानक, गेटमनने फाटक बंद करण्याची घाई केल्याने हा प्रकार घडला असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

याच वेळी दिल्लीकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस जाणार होती. फाटक तुटल्याने राजधानीला धिम्यागतीने पुढे पाठविण्यात आले. दरम्यान या बाबतीत पुर्ण चौकशी झाल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: hit by tempo on railway gate rod get damage

टॅग्स