मुंबईतील 'हा'अनुभवी नेता आता निवडणूक लढवणार नाही

मुंबईतील 'हा'अनुभवी नेता आता निवडणूक लढवणार नाही

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मात्र राजकारणातून बाहेर पडत नसल्याचं वक्तव्य मुंबईतील एका मोठ्या नेत्याने केलंय. होय, मुंबईतील एक अनुभवी नेते आणि बहुजन विकास आघाडीचे वसईचे विधानसभेचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय.    

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. राजकारण कसं नसावं, याचा मला अनुभव आल्याचं ठाकूर म्हणालेत. आता निवडणूक लढवणार नसल्याचंही हितेंद्र ठाकूर म्हणालेत. येत्या काळात तरुण कार्याकार्यांना प्रशिक्षित करून त्यांना निवडणूक लढवण्यास तयार करणार असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय. दरम्यान, राजकारण सोडत नसल्याचं देखील हितेंद्र ठाकूर म्हणालेत.   

58 वर्षीय हितेंद्र ठाकूर हे शिवसेनेच्या विजय पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवतायत. येत्या पाच वर्षात तुम्हाला वेगेळे हितेंद्र ठुकर पाहायला मिळतील. येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील ग्रासरूटवर जाऊन, लोकांच्या समस्या सोडवण्यावर माझा भर राहील असंही ठाकूर म्हणालेत.  


कोण आहेत हितेंद्र ठाकूर ?

हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या करिअरची सुरवात कॉंग्रेसमधून केली. 1990 साली हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडीची स्थापना केली. दरम्यान ते तीनदा पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेत. 2009 आणि 2014 मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या मुलाला संधी देत निवडणूक लढवली नव्हती.  

WebTitle : hitendra thakur of BVA will not contest in coming future 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com