कोंबडभुजे ग्रामस्थांकडून संमतिपत्रांची होळी

कोंबडभुजे ग्रामस्थांकडून संमतिपत्रांची होळी
कोंबडभुजे ग्रामस्थांकडून संमतिपत्रांची होळी

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांकडून घेतलेल्या संमतिपत्रांची कोंबडभुजे ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.१०) होळी करून सिडको प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. मानवी हक्क दिनाचे निमित्त साधून प्रकल्पग्रस्तांनी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन केले. 

शून्य पात्रता ठरवून प्लॉट नाकारतानाच सिडकोने दिशाभूल करून संमतिपत्र घेतल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. त्यांच्या मते स्टॅम्प पेपरवरील या संमतिपत्रावर सिडको प्रशासनाच्या सह्या नसल्याने ते बोगस व एकतर्फी ठरते. याबाबत अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे म्हणाले, की संमतिपत्र सिडको प्रशासनाच्या वकिलाने तयार केले व त्यावर प्रकल्पग्रस्तांच्या सह्या घेतल्या. घरांचे सर्व्हे, पंचनामे झालेले नाहीत. त्या वेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही "जुन्या गावठाणातील कब्जेदार आहात' असे म्हटले होते. जुने असले तरी ते गावठाणच आहेत. राज्य सरकारने विमानतळ बधितांसाठी २०१४ मध्ये पुनर्वसन पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज मान्य करत अनेक प्रकल्पग्रस्तांनी भूसंपादनासाठी संमतिपत्रे दिली. काहींनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार ४० हेक्‍टर जमीन सिडको प्रशासनाने संपादित केली; मात्र या कायद्यानुसार मिळणारे पॅकेज राज्य सरकारने देऊ केलेल्या पॅकेजपेक्षा कमी असल्याने प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकल्पग्रस्तांनादेखील राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते. 

प्रकल्पग्रस्तांना फसवून संमतिपत्र घेण्यात आले आहे. त्याची दुसरी प्रत प्रकल्पग्रस्तांना दिलेली नाही. शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही; मात्र सिडकोने जी श्‍वेतपत्रिका काढली आहे, त्यात कुठे प्लॉट देणार? कोणत्या सुविधा देणार हे नमूद केले होते. आता डिसेंबर २०१९ आला तरीही सिडकोने त्या गोष्टींची पूर्तता केलेली नाही. 
- रामचंद्र म्हात्रे, अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com