
Mumbai News : पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त होळी स्पेशल रेल्वे!
मुंबई : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने साबरमती-ओखा आणि भावनगर-वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद दरम्यान अतिरिक्त होळी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेन क्रमांक ०९४५३ साबरमती – ओखा सुपरफास्ट स्पेशल ६ आणि ८ मार्च २०२३ रोजी साबरमतीहून रात्री ११.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८. २५ वाजता ओखा येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९४५४ ओखा-साबरमती सुपरफास्ट स्पेशल ७ आणि ९ मार्च २०२३ रोजी ओखा येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता साबरमतीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०९२०६ भावनगर - वांद्रे (टी) वन वे स्पेशल सोमवार, ६ मार्च २०२३ रोजी भावनगरहून संध्याकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९२०५ वांद्रे टर्मिनस - अहमदाबाद सुपरफास्ट वनवे स्पेशल मंगळवार, ७ मार्च २०२३ रोजी वांद्रे टर्मिनसवरून सकाळी ११.१५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी अहमदाबादला संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचेल. या होळी स्पेशल रेल्वे गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळांवर सुरु झाले आहे.