Holi special train : पश्चिम रेल्वे मार्गावर होळी स्पेशल ट्रेन ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi special train on Western Railway Ahmedabad - Karmali Superfast mumbai

Holi special train : पश्चिम रेल्वे मार्गावर होळी स्पेशल ट्रेन !

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने उधना-मंगळुरू, अहमदाबाद - करमाळी आणि ओखा -नाहरलगुन दरम्यान विशेष भाड्यावर होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेक क्रमांक ०९४१२ अहमदाबाद - करमाळी सुपरफास्ट स्पेशल अहमदाबादहून मंगळवारी ७ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि करमाळी येथून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९४११ करमाळी - अहमदाबाद विशेष बुधवार, ८ मार्च २०२३ रोजी करमाळी येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता अहमदाबादला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९०५७ उधना - मंगळुरु स्पेशल उधना येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता मंगळुरूला पोहोचेल.

ही ट्रेन १ आणि ५ मार्च २०२३ रोजीपर्यत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५८ मंगळुरू - उधना स्पेशल मंगळुरू येथून रात्री ९.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ वाजता उधना येथे पोहोचेल. ही ट्रेन २ आणि ६ मार्च २०२३ रोजीपर्यत धावेल. ट्रेन क्रमांक ०९५२५ ओखा – नाहरलगुन स्पेशल मंगळवारी, ७ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजता ओखाहून सुटेल आणि शुक्रवारी दुपारी ४ वाजता नाहरलगुन येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९५२६ नाहरलगुन – ओखा विशेष ट्रेन शनिवार, ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि मंगळवारी मध्य रात्री ३.३५ वाजता ओखा येथे पोहोचेल. या होळी विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण रविवारपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

टॅग्स :Mumbai Newsrailway