अशीही माणुसकी! सेवानिवृत्त नर्सेकडून घरच्या घरी महिलेची प्रसुती 

अशीही माणुसकी! सेवानिवृत्त नर्सेकडून घरच्या घरी महिलेची प्रसुती 

मुंबई- 64 वर्षीय सेवानिवृत्त नर्सेनं आपल्या शेजारच्या महिलेची घरच्या घरी प्रसुती करण्यात मदत केली. दादरमधील सुंदर नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये ही प्रसुती करण्यात आली. 

सेवानिवृत्त नर्स नयना नंदकुमार हुद्दार, ज्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहतात. सकाळी 7.30 च्या सुमारास शेजारी असलेल्या पूजा विजय मिश्रा यांचं दार कोणीतरी जोरजोरात ठोकत असल्याचा आवाज आला. हुद्दार आणि काही शेजारी दरवाजा कोण ठोकत आहे बघायला गेल्यावर, त्यांना मिश्रा यांचा भाऊ दार ठोकत असल्याचं आढळलं. त्यांच्या भावानं शेजाऱ्यांना तिला लेबर पेन होत असल्याचं सांगितलं. दरवाजा आतमधून बंद होता आणि मिश्रा यांची प्रसूती होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांना उठून दरवाजा उघडणं अशक्य होतं. 

हुद्दार, या मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त नर्स असून त्यांनी 34 वर्ष काम केलं आहे. मिश्रा यांची परिस्थिती बघून हुद्दार यांनी त्यांना बाळाला पोटाच्या जवळ पकडण्यास सांगितलं आहे. स्वतःला दरवाज्याच्या दिशेनं ढकलून दरवाजा उघडण्यास सांगितलं. त्यावेळी घरात तिच्यासोबत तिचा दोन वर्षांचा मुलगा देखील होता. 

हुद्दार यांनी सांगितलं की, तिची परिस्थिती खूप गंभीर होती. मी पाहिलं की बाळ पूर्णपणे बाहेर आलं होतं. त्यानंतर मी लगेचच माझ्या घरात गेली. आम्ही दोघीही एकाच मजल्यावर राहतो. मी घरातून ग्लोव्ह्ज, स्पिरिट आणि कात्री आणली. मी पहिल्यांदा त्याचा उपयोग umbilical cord कापण्यासाठी केला. त्यानंतर प्रसुती केली. त्यांना मुलगा झाला असून त्याला सुद्धा स्वच्छ केलं आणि मिश्रा यांच्या भावाच्या हातात दिलं. 

मिश्रा आणि तिच्या बाळाला प्रसूतीनंतरच्या काळजीसाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले. बाळ आणि आईची या दोघांची प्रकृती ठिक असल्याचं हुद्दार यांनी सांगितलं. रक्तस्राव जास्त झाला असला तरी प्रसुती सामान्य झाली आहे. सेवानिवृत्त होण्याचा अर्थ असा नाही की मी लोकांना मदत करणं थांबवलं. जर कोणी मला फोन करुन माझ्याकडे मदत मागितली तर मी नेहमीच त्यांच्यासाठी हजर असेन, असंही हुद्दार यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com