घरगुती गॅसचा काळाबाजार रोखणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई - शिधापत्रिकेवर मिळणारा घरगुती स्वयंपाकाचा गॅस काळा बाजारात मोठ्याप्रमाणात विकला जात असल्याच्या तक्रारी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी या विभागाने तपासणी मोहीम उघडली आहे.

राज्यातील पेट्रोलियम पदार्थांशी निगडित अनियमित गोष्टींना पायबंद घालण्याच्या हेतूने पेट्रोलियम पदार्थाच्या नियमित तपासणी करण्याबाबतच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत. यामध्ये प्रत्येक गॅस एजन्सीची तपासणी करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर क्षेत्रीय अधिकाऱ्याने त्याच्या अधिकार कक्षेत गॅस एजन्सी तपासणी करताना विहीत मानाकांप्रमाणे कराव्यात. तसेच, त्याबाबतची सर्व माहिती, आढावा दर महिन्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, असा सक्‍त आदेश अन्न व नागारी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने दिला आहे.

Web Title: Home gas Blackmarket

टॅग्स