रावसाहेब दानवे यांच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पलटवार

पूजा विचारे
Thursday, 8 October 2020

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनीचे असल्याचे म्हटलं. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवे यांना त्याच शैलीत प्रत्त्युत्तर दिलं आहे.

मुंबईः भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनीचे असल्याचे म्हटलं. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवे यांना त्याच शैलीत प्रत्त्युत्तर दिलं आहे. 'होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हों तीनों अमर, अकबर, अँथोनी', हे 'अमर अकबर अँथोनी' सिनेमातील गाण्याचे बोल ऐकवतच अनिल देशमुख यांनी रावसाहेब दानवे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे राज्यातले महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. मात्र, तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार, प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची विचारला आहे. या संदर्भात दानवे यांनी ट्वीट केलं आहे. 

 

यावर गृहमंत्र्यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. या ट्विटमध्ये देशमुखांनी रावसाहेब दानवे यांना टॅग करत हा पलटवार केला आहे.

 

अनिल देशमुखांनी ट्विटमध्ये लिहिलं की, मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनीचे असल्याचे म्हटले आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!

Home Minister Anil Deshmukh criticizes BJP leader Raosaheb Danve


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh criticizes BJP leader Raosaheb Danve