कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

पूजा विचारे
Wednesday, 4 November 2020

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

मुंबईः  रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलीय. आता अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करत असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलं. तसंच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांनी अटक केली ही कायद्यानेच केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले होते.  ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.  नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

अर्णब गोस्वामी यांनी पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर अभिनेत्री कंगना राणावतनं  पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला.. यात ठाकरे सरकारवर निशाणा साधत आक्षेपार्ह उल्लेख केलेत.

अधिक वाचाः  अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनानं म्हटलं आहे की,  तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. त्यांना त्रास दिलात,  तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात? सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे?मात्र हा आवाज वाढत जाणार आहे.

पुढे कंगनानं व्हिडिओमध्ये म्हटलं की,  ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोकांचे बळी गेले. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,

तुम्हाला कोणी पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो.  लोक तुम्हाला पप्पू सेना म्हणतात तेव्हा तुम्हाला राग येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…तुम्ही पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनिया सेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनिया सेनेचे लोक.

Home Minister Anil Deshmukh reaction after Arnab Goswami arrest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh reaction after Arnab Goswami arrest