Dilip Walse Patil | राजकीय संबंध लावू नका; शरद पवारांच्या 'त्या' फोटोवर वळसे पाटलांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil
राजकीय संबंध लावू नका; शरद पवारांच्या 'त्या' फोटोवर वळसे पाटलांची प्रतिक्रिया

राजकीय संबंध लावू नका; शरद पवारांच्या 'त्या' फोटोवर वळसे पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या भेटीसाठी जाणार होते. मात्र हा दौरा स्थगित करण्यात आला. या दौऱ्याच्या विरोधासाठी शरद पवार आणि राष्ट्रवादीवरच आरोप केले आहेत. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांचे काही फोटो शेअऱ करत हा आरोप केला आहे. यावरच आता राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी भाष्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना वळसे पाटलांनी या विषयाचा राजकीय संबंध न जोडण्याचं आवाहन केलं आहे. वळसे पाटील म्हणाले, "शरद पवार अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे प्रमुख आहेत. बृजभूषणही त्यांच्या राज्यातल्या कुस्ती संघटनेचे प्रमुख आहेत. जुन्या काळातल्या कुस्तीच्या कार्यक्रमातला तो फोटो दिसतोय मागच्या पोस्टरवरून, त्यामुळे त्याचा आणि ह्याला राजकीय संबंध लावण्याचं कारण नाही."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित कऱण्यात आला आहे. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. हा विरोध म्हणजे एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याच आरोपासंदर्भातले संकेत देणारे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. (Home Minister Dilip Walse Patil)

हेही वाचा: शिवसेनेची ऑफर स्विकारली? संभाजीराजेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा

संभाजीराजे आणि शिवसेनेत सुरू असलेल्या राज्यसभेच्या जागेसाठीच्या चर्चांबद्दल बोलताना वळसे पाटील म्हणाले,"मी त्या सगळ्यात कुठेच नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं उचित नाही. याबद्दल प्रदेशाध्यक्ष बोलतील आणि निर्णय जाहीर करतील" (Sambhajiraje Chhatrapati)

पुण्यात मंदिरांच्या जागेवर मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

"यावेळी हा विषय काढून देशात आणि राज्यात अस्वस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटतं या गोष्टीला महत्त्व देऊ नये. ४००-६००-१०० वर्षांपूर्वी ज्या घटना घडल्या त्यावरून मंदिर मस्जिद वाद निर्माण करून वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय. तर अशा प्रकारचे वक्तव्य आणि कृती करू नये. वक्तव्य ठीक आहे, पण कृती केली तर पोलीस कारवाई करतील. महत्त्वाच्या विषयावर कोणाला चर्चा करायची नाही. आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. जाणूनबुजून विषय काढले जातायत".

हेही वाचा: पुण्यातही 'ज्ञानवापी?'; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

ओबीसी आरक्षण प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी मिळेल

"सर्व पक्षांचा आरक्षणाविषयीचा आग्रह आहे. छगन भुजबळ सर्वोच्य न्यायलयापर्यंत लढतायत. प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी आरक्षण लागू होईल. इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाला देऊन निवडणुकीचे आदेश घेऊन या समाजाला संधी मिळेल". (OBC Political Reservation )

नवाब मलिक निर्दोषच

"इतक्या वर्षांनंतरच्या गोष्टी काढून त्यात नवाब मलिकांना गुंतवायचा प्रयत्न झाला. त्यात काही ततथ्य वाटत नाही. ईडीला काय मिळालं हा वेगळा भाग आहे. पण नवाब मलिक निर्दोष आहेत." (Nawab Malik ED)

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाकरेंचे संबंध कसाबशी; सोमय्यांचा आरोप

"ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. कशाचातरी कशाशी संबंध जोडायचा. कोण अग्रवाल कोणतं बुलेटप्रुफ जॅकेट? त्यांना कुठून माहिती मिळते मला माहित नाही पण यात काही तथ्य आहे, असं मला वाटत नाही".

Web Title: Home Minister Dilip Walse Patil On Mns Sharad Pawar Nawab Malik Rajyasabha Seat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top