डान्सबारसंदर्भातील सरकारच्या अटींवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब : रणजित पाटील

डान्सबारसंदर्भातील सरकारच्या अटींवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब : रणजित पाटील

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसंदर्भात दिलेला निर्णय हा संमिश्र स्वरूपाचा आहे. डान्सबारसंदर्भातील राज्यातील जनतेच्या भावना प्रतिकूल आहेत. त्यामुळे त्या भावनांचे प्रतिबिंब या निकालात नाही. राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा करताना ज्या अटी टाकल्या होत्या, त्यातील अनेक अटींवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तबच केले आहे, असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आज (गुरुवार) सांगितले.

महाराष्ट्र सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्यातील डान्सबार पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यावर पाटील यांनी सांगितले, की ''डान्सबारमध्ये अश्लिलतेला कोणतेही स्थान असणार नाही. डान्सबार मालक आणि नर्तिका यांच्यात करार असला पाहिजे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालातून शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारने हा कायदा करताना वेळेचीही मर्यादा घातली होती. ती 6 ते 11.30 अशी राहील, हेही सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''नर्तिकांवर पैसे उधळता येणार नाही, ही सुद्धा राज्य सरकारची अट सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तथापि, माध्यमांतील वृत्तांकनाच्या आधारे या बाबी स्पष्ट होत असल्यातरी या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर सविस्तर अभ्यास करूनच पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, अशी राज्य सरकारची भूमिका आहे''.

दरम्यान, या निकालाच्या अधीन राहत आणि सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखत डान्सबारच्या नावाखाली अनूचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही. असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेल, असेही रणजित पाटील म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com