परवडणाऱ्या घरांसाठी सरकारचे निकष नको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मुंबई - परवडणाऱ्या घरांसाठी राज्य सरकारने २०१८ मध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एक आणि अडीच चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार आहे. मात्र, महानगरपालिकेने विकास आराखड्यातच तीन आणि चार चटई क्षेत्र निर्देशांकाची शिफारस केली आहे. त्यामुळे महापालिका नियोजन प्राधिकरण असलेल्या क्षेत्रात हा निर्णय लागू करू नये, अशी शिफारस करण्यात येणार आहे.
पालिकेने विकास आराखड्यात ना विकास क्षेत्रातील तीन हजार हेक्‍टर जमिनीवर परवडणारी घरे बांधण्याची योजना तयार केली आहे. त्यांच्यासाठी चार चटई क्षेत्राची शिफारस करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार मुंबईत सुमारे १० लाख परवडणाऱ्या घरांची गरज आहे.

सरकारने २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात अधिसूचना प्रसिद्ध करून सर्वसामान्य ठिकाणी २.५ एफएसआय आणि ना विकास क्षेत्र किंवा शेत जमिनीवर एक एफएसआय देण्याचे जाहीर केले होते. मात्र, पालिकेने यावर आक्षेप घेतला आहे. महानगरपालिकेने विकास आराखड्यात परवडणाऱ्या घरांसाठी तीन ते चार चटई क्षेत्र निर्देशांक देण्याची शिफारस केली आहे. त्यावर राज्याच्या नगरविकास विभागाच्या समितीने सूचना व हरकती मागवल्या आहेत.

Web Title: Home State Government