होमिओपॅथी डॉक्‍टरांचे उपोषण मागे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयकात दुरुस्ती सुचवण्याच्या आश्‍वासनानंतर होमिओपॅथी डॉक्‍टरांनी तिसऱ्या दिवशी बुधवारी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यापूर्वी या डॉक्‍टरांनी जे. जे. रुग्णालयातून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. 

नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयकात ब्रिज कोर्सचा उल्लेख असावा, यासाठी होमिओपॅथी डॉक्‍टरांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने तिसऱ्या दिवशी आंदोलन तीव्र करण्यासाठी फेरी काढण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला; परंतु ही फेरी रोखण्यात आली. त्यानंतर डॉक्‍टरांनी आक्रमक होत रस्त्यावर झोपण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ऑल इंडिया होमिओपॅथी डॉक्‍टर्स असोसिएशनचे डॉ. प्रकाश राणे यांनी दिली. दरम्यान, राज्यात ब्रिज कोर्सला परवानगी असली, तरी देशात ती परवानगी नाही. त्यामुळे केंद्रात विधेयक मंजूर झाल्यानंतरच दुरुस्तीचा पर्याय आहे. यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्‍वासन आरोग्य विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी दिले. 

Web Title: Homeopathic doctor fasting