राज्यातील होमिओपेथी डॉक्टरांचे मुंबई येथे आमरण उपोषण

दीपक हीरे
रविवार, 1 एप्रिल 2018

केंद्र सरकारने कॅबिनेट एनएमसी बिलमधुन ब्रिज कोर्स काढून टाकण्याचा निर्णय जाहिर केला, या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील 65 000 होमिओपेथी डॉक्टरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला आहे. आयएमए च्या दबावखली हा निर्णय केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे व ब्रिज कोर्स ची जबाबदारी राज्यवार ढकलली आहे.

वज्रेश्वरी : ऑल इंडिया होमिओपेथी डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेची सरकार कड़े विविध मागण्या संदर्भात लक्ष्वेधी करण्यासाठी ता 2 एप्रिल रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती येथील संघटनेचे समन्वयक डॉक्टर संतोष अवयार  यानी आज अंबाड़ी येथे झालेल्या बैठकीत माहिती दिली आहे

केंद्र सरकारने कॅबिनेट एनएमसी बिलमधुन ब्रिज कोर्स काढून टाकण्याचा निर्णय जाहिर केला, या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील 65 000 होमिओपेथी डॉक्टरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला आहे. आयएमए च्या दबावखली हा निर्णय केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे व ब्रिज कोर्स ची जबाबदारी राज्यवार ढकलली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने CC MP हे प्रमाणपत्र कोर्स दोन वर्षापासून रद्द केले आहे मात्र कायदेशीर रित्य या कोर्स ची वैधता ही आय एम ए विरुद्ध महाराष्ट्र सरकार  या उच्च न्यायालय निर्णय वर अवलंबून राहीन अशा आशयचे प्रतिज्ञा पत्र लिहून घेतले जाते. या मुळे होमिओपेथी डॉक्टरांना न्याय मिळवा म्हणून त्यांच्या मागण्या बाबत आमरण उपोषण करणार आहेत.

मागणी 1 कोर्स चें न्यायिक वैधतेने महाराष्ट्रचे अधिवक्ता यांचे मत लेखी मिळावे ही मुख्य मागणी आहे 2 एन एम सी बिल मध्ये नीति अयोगच्या शिफारिश नुसार असलेला ब्रिज कोर्स हा शब्द वगळून तसाच केंद्र सरकारने लागू करावा 3 सि सि एम पी या कोर्स ची जागा किमान दहा हजार प्रति वर्षी वाढवावी 4 होमिओपेथी डॉक्टरांची नियुक्ति पी एच सी, आर एच, आर बी एस के, एन आर एच एम या विविध सरकारी आरोग्य योजनावार करावी 5 राज्यातील सर्व नर्सिंग होमची चौकशी निवृत्त न्याय धीश मार्फत करण्यात यावी 6 सी सी एम पी कोर्स केलेल्या डॉक्टरांची  नोंदणी  एम एम सी मधे समांतर केले पाहिजे व त्याबबत राज्य अधिवक्ता चे न्यायिक मत पाहिजे 7 ड्रग्स फ़ॉर कॉस्मेटिक एक्ट 1945 मधील एक्सलुडिनो होमिओपेथी हा शब्द काढून आर एम पी च्या व्याखेत या डॉक्टरांना आणण्यासाठी केंद्र सरकारने तसा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठ पुरावा करावा अश्या मागण्या बाबत आमरण उपोषण करणार आहेत दरम्यान या सर्व वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात हे डॉक्टर पुरवित असतात त्यामुळे या आंदोलनचा फटका ग्रार्मीण भागातील जनतेवर पडणार आहे कारण ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य हेच डॉक्टर संभाळत असल्याने केंद्र सरकारने व राज्य सरकारने या डॉक्टरांना दिलासा द्यावा अशी मागणी ऑल इंडिया होमिओपेथी डॉक्टर संघटनेचे समन्वय डॉ संतोष अवयार, सदस्य डॉ प्रदीप पाटील, तसेच डॉ नीलेश जाधव यानी पंत प्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व संबंधित आरोग्य  विभाग कड़े लेखी निवेन्दन द्वारे केली असून येत्या 2 एप्रिल ला मुंबई आज़ाद मैदान येथे राज्यातील सर्व होमिओपेथी डॉक्टर बरोबर आमरण उपोषणास बसणार आहेत.

Web Title: Homeopathy doctors strike in Mumbai