दिड लाखांचे दागिने परत करणारा रिक्षावाला

प्रमोद पाटील 
रविवार, 15 जुलै 2018

सफाळे (जि. पालघर) : अलिकडे बेरोजगारीमुळे समाजात चोऱ्यामाऱ्या होत असताना ग्रामीण भागात मात्र आजही माणुसकी शिल्लक आहे. हे पुन्हा एकदा सफाळ्यातील रिक्षाचालक राजेश पाटीलने दाखवून दिले. सुमारे दीड लाखाच्या दागिन्यांचा ऐवज प्रवासी महिलेस परत करून त्याने प्रामाणिकतेचे दर्शन घडवले आहे. 

भागीरथी घरत ह्या ज्येष्ठ महिला रविवारी (ता.15) सफाळे येथून विळंगीला आपल्या घरी जात असताना राजेश पाटील (आगरवाडी) यांच्या रिक्षात बसल्या. पावसाचा जोर वाढत असल्याने काळजी म्हणून चेन, मंगळसूत्र आदी सर्व दागिने आजीने पाकिटात काढून ठेवले होते. मात्र रिक्षाचे भाडे देताना दागिने असलेले पाकीट रिक्षातच राहिले व भागीरथी घरी निघून गेल्या. हि बाब राजेश च्या लक्षात येताच त्याने तत्काळ विळंगी गावात धाव घेतली व त्यांने आजीचे दागिने व अन्य वस्तू परत केल्या. राजेशने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: honest auto rickshaw driver