"ओल्ड मर्क्‍स'च्या कामगारांच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

एपीएम टर्मिनल कामगारांपा पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर, सरपंच पागोटे, ऍड. भार्गव पाटील, माजी गाव-अध्यक्ष रजनीकांत पाटील, कॉम्रेड जयवंत पाटील यांच्याव्यतिरिक्त कामगारनेते भूषण पाटील, वहाळ साई संस्थानचे रवीशेठ पाटील,जेएनपीटी विश्वस्त रवींद्र पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील, संतोष पवार, धुतूमचे सरपंच शरद ठाकूर, "कॉन' संस्थेचे राजू मुंबईकर, निशांत घरत, सरपंच नवीन शेवे; तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्तित होते.

उरण : एपीएम टर्मिनलचे 99 कामगार चार दिवसांपासूनर धरणे आंदोलन करत आहेत. कंपनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याने; तसेच शनिवारी (ता.3) उपोषणात सहभागी होणार असल्याने कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 
कामगारांपा पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर, सरपंच पागोटे, ऍड. भार्गव पाटील, माजी गाव-अध्यक्ष रजनीकांत पाटील, कॉम्रेड जयवंत पाटील यांच्याव्यतिरिक्त कामगारनेते भूषण पाटील, वहाळ साई संस्थानचे रवीशेठ पाटील,जेएनपीटी विश्वस्त रवींद्र पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील, संतोष पवार, धुतूमचे सरपंच शरद ठाकूर, "कॉन' संस्थेचे राजू मुंबईकर, निशांत घरत, सरपंच नवीन शेवे; तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्तित होते.
 
उरणमधील सर्व नेत्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा.  ते आपले समाजबांधव आहेत. ते टिकले तरच आपले राजकीय अस्तित्व टिकेल, याचा कोणीही विसर पडू देऊ नये. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर, कोकण पदवीधर शिक्षक आमदार बाळाराम पाटील येत आहेत. त्यामुळे कामगारांचा प्रश्‍न नक्कीच मार्गी लागेल. 
- वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hope of the workers of the "Old Marx" is growing