esakal | #HopeOfLife : अंडकोषाच्या कर्करोगाबाबत जागरूक राहा!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

#HopeOfLife : अंडकोषाच्या कर्करोगाबाबत जागरूक राहा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंडकोषाचा कर्करोग फारच दुर्मिळ आहे. कदाचित हेच कारण आहे की बऱ्याच वेळा हा आजारही वेळेत कळत नाही, परंतु बऱ्याच वेळा पुरुष उशिराच नव्हे, तर चुकीचे उपचार घेतानाही दिसतात. अंडकोष कर्करोगाचा परिणाम २०-४० वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये दिसून येतो. हे वय महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीने परिपूर्ण असल्याने या आजाराबद्दल जागरुक राहण्याची अधिक गरज आहे. परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या जननेंद्रिय युरो-वैद्यकीय कर्करोग विभागाने वर्षाला सुमारे २०० प्रकरणे हाताळली असून यात पाच अंडकोष कर्करोगाच्या रुग्णांना जीवदान दिले आहे. अंडकोषाच्या कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांचा आढावा...

#HopeOfLife : होय, प्रदूषणामुळे कर्करोग होतो.

अंडकोषाच्या कर्करोगात रुग्णाला बऱ्याच वेळा वेदना होतात. अंडकोषाचा आकार वाढतो. हायड्रोसीलमुळे ही वाढ होते. बहुतेक वेळा ती वेळेत लक्षात येत नाही. डॉक्‍टरांच्या मते, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे हा कर्करोग टेस्टिस ट्यूबमधून पोटात पसरू शकतो. काही वेळा तो फुफ्फुसापर्यंत पोहोचतो.

अधिकाधिक नागरिकांना अंडकोषाच्या कर्करोगाबद्दल जागरूक करणे आवश्‍यक आहे. अंडकोषाचा आकार वाढत असेल, तर कर्करोगाची शक्‍यता लक्षात घेऊनही तपासणी व्हायला हवी.
- डॉ. अमित जोशी,
ऑन्कोलॉजिस्ट, टाटा हॉस्पिटल

रोहित तांडेल, इंदोर ः अंघोळ करताना मला अंडकोषाचा आकार वाढल्याचे जाणवले. वैद्यकीयचा विद्यार्थी असल्यामुळे तातडीने रक्त तपासणी करून घेतली. त्यात कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खूपच मानसिक ताण वाढला. मित्रांनी डॉक्‍टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी ठाम झालो आणि डॉक्‍टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

#HopeOfLife यकृताचा कर्करोग कारणे आणि उपचार

राहुल शंकर ः अंडकोष कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर खूपच घाबरलो होतो, पण कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर टाटा रुग्णालयातच उपचाराचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया टाटा हॉस्पिटलमध्येच करण्याचे ठरवले. १० महिने उपचार घेतल्यानंतर पुन्हा आयुष्यात उभा राहू शकलो.

उदय बोराडे ः २०१७ मध्ये खासगी रुग्णालयात माझ्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. त्या वेळी खर्च खूप आला. त्यानंतर टाटा रुग्णालयात उपचार करण्याचे ठरवले. वेळेत उपचार घेतल्याने जीवदानच मिळाले. मला कुटुंबाने खूप आधार दिला म्हणून मी या आजाराशी लढा देऊ शकलो. कारण कर्करोग या शब्दाचीही भीती वाटायची. आता एक-एक वर्षाने उर्वरित उपचारासाठी रुग्णालयात जातो.

लक्षणे...
अंडकोषात असमान वाढ
अंडकोषात ट्यूमर
पोटात ट्यूमर

#HopeOfLife : Beware of testicles Cancer

loading image
go to top